कोंढाळकर वडेवाले

कोंढाळकर वडेवाले ची सुरूवात पुण्यामधील भोर शहरातील भोलावडे या गावामध्ये झाली .
माझे वडील दत्तात्रय कोंढाळकर यांनी हॉटेल व्यवसायाचा अनुभव व चविष्ट वडापाव येत असल्यामुळे भोरमध्ये पृथ्वीरज पेट्रोल पंपा समोर वडापावचा व्यवसाय २००९ साली त्यांनी सुरू केला. त्यांनी नेहमीच येणाऱ्या ग्राहकांचे स्वागत गरमागरम, खुसखुशीत व चविष्ट वडापाव देऊनच केले. म्हणून आमचा ग्राहकांच्यासाठी तळलेली हिरवी गार मिरची शेंगदाण्याची लाल चटणी व चिंचाची आंबट गोड चटणीची चव काही निराळीच त्यासोबत उत्कृष्ट चवीचा चहा असल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद हा प्रचंड मिळत गेला .
वडीलानंतर मलाही ह्या व्यवसायाची आवड असल्यामुळे २०१८ साली शिक्षणा सोबत मी ही ह्या व्यवसायात यायचे ठरवले . व्यवसाय पुढे चालू ठेवत असताना आमचा लक्षात असे आले की लांबून येणाऱ्या प्रवाश्यांना व ग्राहकांना वडापाव सोबत आणखी काहीतरी हवे असतं असा त्यांचा नेहमी आग्रही करत असतं त्यामुळे वडापाव व चहा सोबतच कुरकुरीत कांदा भजी व बटाटे भजी झणझणीत पुणेरी मिसळ,स्पेशल मिसळ,रस्सावडा,भेळ ओळी भेळ हे पदार्थ देखील सुरू केलं व या पदार्थांना देखील चांगला प्रतिसाद ग्राहकांने दिला.
भोर हे ऐतहासिक ठिकाण असल्यामुळे व कोकणाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर येत असल्यामुळे पर्यटक देखील येतात व जास्त पर्यटक हे पुणे मुंबईतील आहेत त्यांनी वडापावचा आस्वाद घेतल्यावर तुमची पुण्यामध्ये कोठे शाखा आहे का ? अशी चौकशी ग्राहक आवर्जून करतात. आम्ही स्वताला खूप भाग्यवान मानतो की आमच्याकडे येणारे ग्राहक हे आम्ही बनवलेल्या पदार्थांचे आवर्जून कौतुक करून जातात. आमच्याकडे तयार होणारे खाद्यपदार्थ तयार करत असताना आम्ही गुणवत्तेचा बाबतीत कधीच तडजोड करत नाही. ह्याच चवीचा आणि उत्कृष्ट दर्जाच्या गुणवत्तेच्या जोरावर कोंढाळकर वडेवाले घेऊन आलो आहोत QSR फ्रँचायझी मॉडेल या मॉडेल द्वारे महाराष्ट्रातील तरुण तरुणींना या व्यवसाय क्षेत्रात आणून मराठी उद्योजक तयार करणे व कोंढाळकर वडेवाले हा ब्रँड जगप्रसिद्ध करणे हाच आमचा मूळ उद्देश आहे कोंढाळकर वडेवाले हा ब्रँड आम्ही विकसित केला आहे. मी व माझ्यासारख्या अनेक तरुणांचे यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न आम्ही पूर्ण करू याची मला खात्री आहे .

Our Menu

भूक लागली असेल तर इथे चांगला वडा, टर्की आणि वडापाव या.

आनंदी तास

सकाळी 8 ते संध्याकाळी 7 – सोमवार ते रविवार